ब्राम्हणी – परिसरातील जागृत देवस्थान श्री बहिरोबा महाराज यांच्या नवीन मंदिराचा कलशारोहन सोहळा उद्या शनिवार 15 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
उद्या शनिवार 15 रोजी सकाळी 7 ते 8 महा अभिषेक सकाळी 8 ते 9.30 कलश व महाज्योत मिरवणूक,सकाळी 10 वाजता कलशारोहन सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे.सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत स्वामी अरुणाथ गिरी महाराज यांची किर्तन सेवा होईल. याप्रसंगी स्वामी शामानंदगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वांनी 15 फेब्रुवारी रोजी बहीरोबा महाराज मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक यांच्या वतीने करण्यात येत आहे.