महेश देवढे – (नेवासा प्रतिनिधी) – यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त करून आनंदात साजरा करा.सोशल मीडियावर सायबर क्राईमच्या माध्यमातून करडी नजर असणार असल्याचे श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी सांगितले.
नेवासा येथील पंचायत समितीच्या सभागृहात नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित नेवासा तालुका शांतता समितीचे सदस्य,गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधतांना अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे ,नायब तहसिलदार चांगदेव बोरुडे, गटविकास अधिकारी पाटेकर, नगरपंचायत प्रसाशकीय रामदास म्हस्के, होमगार्ड समादेशक आधिकारी बाळासाहेब देवखिळे, नगरसेवक इंजि सुनील वाघ, महावितरण अभियंता आधिकारी वैभव कानडे , प्रेस क्लब चे अध्यक्ष मोहन गायकवाड , यांच्या सह विविध खात्याचे अधिकारी व मंडळाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी गणेश मंडळ व शांतता समितीच्या कार्यकत्यांनी मिरवणूक मार्गावर येणारे अडथळे मोकाट जनावरांचा त्रास तसेच विद्युत पुरवठा खंडीत न होण्याबाबत मागण्या मांडल्या यावेळी उपस्थित संबधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत लगेच तत्परता दाखविण्यासाठी योग्य नियोजन करा अशा सूचना अप्पर पोलीस अधीक्षकांनी यांनी केल्या.
पुढे बोलताना भोर म्हणाल्या की विश्वावाला शांतीचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलीचे गावं आहे इथे शांती राहणारच मी गेल्या तीन वर्षांपासून नेवासा गणेशोत्सव बंदोबस्त करते. त्यामुळे खात्रीपूर्वक यंदा देखील शांतपणे उत्सव साजरा होईल अशी अपेक्षा आहे
गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर वातावरण दूषित करणारे व समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज पडतील याबाबत कोणतीही भूमिका घेण्याअगोदर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा गणेशोत्सव मंडळाने रितसर परवानगी घ्यावी मंडळाच्या गणपती जवळ मंडळाचा कार्यकर्ता रात्री संरक्षणासाठी असावा,यंदा मंडळ दत्तक योजना देखील आम्ही सुरू केली आहे व एक खिडकी योजना देखील पोलीस ठाण्यात उपलब्ध असणार विसर्जन वेळी वाहनांची योग्य तपासणी करून घ्यावी नगरपंचायतने देखील रस्त्यात अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करावा व सर्वांनी शांततेच्या मार्गाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन केले.
यावेळी बहुजन समाजाचे युवा नेते संजय सुखदान, मुस्लिम समाजाचे नेते ईमरान भाई दारुवाले, जेष्ठ नेते गफूरभाई बागवान, अजित नरुला,मनसेचे संतोष गव्हाणे,सहकार सेनेचे बालेंद्र पोतदार, युवा नेते स्वप्नील मापारी, यांनी महत्वपूर्ण सूचना यावेळी केल्या.
या बैठकीस नगरसेवक राजेंद्र मापारी,जावेद ईनामदार , शिवा राजगिरे, रविंद्र पिंपळे ,निरंजन डहाळे, जालिंदर गवळी, नितीन जगताप, दीपक धोत्रे, कृष्णा डहाळे,अल्ताफ शेख, महेश देवढे,अभिजित ढोकणे, पत्रकार गुरूप्रसाद देशपांडे, सुहास पठाडे, रमेश शिंदे, शंकर नाबदे, अभिषेक गाडेकर, इस्माईल शेख, पोलीस पाटील रिंधे, साठे, यांच्या सह तालुक्यातील पोलीस पाटील व सरपंच विविध संस्थेचे पदाधिकारी व मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर आभार समादेशक आधिकारी बाळासाहेब देवखिळे यांनी मानले.
मंडळाच्या वतीने देखावा व इतर डेकोरेशन वरती वायफट खर्च नकरता परिसरातील शालेय विद्यार्थी ना सायकल, वह्या पुस्तके गणवेश व इतर साहित्य गणेशोत्सव निमित्ताने भेट द्यावे असा आगळा वेगळा उपक्रम मंडळांनी हाती घ्यावा असे देखील आव्हान मंडळाच्या पदाधिकारी यांना यावेळी भोर यांनी केले.
गणेशोत्सव मंडळ दत्तक योजना यंदा असणार आहे यामध्ये एक पोलीस दहा दिवस मंडळाच्या संपर्कात असणार व मंडळ दत्तक घेणार आहे तसेच त्या मंडळाची जबाबदारी देखील संबंधित कर्मचारी याच्या वर असणार मंडळा जवळ तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत मंडळाचे देखावे बघण्यासाठी आलेल्या भक्तांची काळजी घ्यावी.
शिवाजीराव डोईफोडे
पोलीस निरीक्षक