Home अहमदनगर निकाला आधीच पोस्टर

निकाला आधीच पोस्टर

11
0

 

राहुरी- राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांचे आमदार झाल्याचे बॅनर वांबोरीत झळकले असून ‘बघतोस काय रागानं, आमदारकी जिंकली वाघानं!’ या स्लोगनचे फलक वांबोरीतच्या हद्दीत झळकले आहेत.

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि.२०) मतदान पार पडले. शनिवारी मतमोजणी होणार आहे. पण त्याआगोदरच माजी मंत्री तथा विद्यमान आमदार. प्राजक्त तनपुरे यांचे विश्वासू समर्थक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी प्राजक्त तनपुरे यांचे आमदार झाल्याचे फलक झळकावले आहेत.

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (शरद पवार) प्राजक्त तनपुरे, महायुतीकडून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह १० उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. दरम्यान, मतमोजणीपूर्वीच प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास असल्याने निकालाआधीच आमदार झाल्याचे फलक लावले गेले आहेत.त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here