Home क्राईम क्राईम – गोळीबार

क्राईम – गोळीबार

9
0

राहुरी : मतदारसघांतील निवडणूकीच्या वादातून राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबात समजलेली माहिती अशी की, आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आम्ही दोघे गुंजाळे बसस्थानकासमोर असणार्‍या किराणा दुकानाजवळ उभे होते. चार जणांनी दोघांना शिवीगाळ करत दमदाटी केली. याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर त्यांच्याकडे असणार्‍या गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ती गोळी नवले यांच्या गुडघ्याला लागली. तर एकावर कुर्‍हाडीने हल्ला करून डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घातला. या घटनेनंतर हल्लेखोर तेथून पसार झाले असल्याची माहिती जखमींनी दिली. तसेच काल विधानसभेच्या निकालानंतर रात्री हल्लेखोरांनी नवले यांना फोनवर शिवीगाळ करीत दमदाटी व तुझा बेत बघतो अशी धमकी दिली होती. असेही त्यांनी सांगीतले.
दरम्यान, स्थानिकांनी तातडीने जखमी नवले यांना नगर येथे तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. जखमी नवले यांच्या पायाला गोळी लागली असून ती शस्त्रक्रिया करून काढण्यात येणार असल्याचे नातेवाईंकांनी सांगीतले. याघटनेची माहिती मिळताच राहुरीचे पो.नि. संजय ठेंगे यांनी आपल्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास करून दोषींना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पीआय ठेंगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here