Home अहमदनगर पत्रकारांकडून अधिकाऱ्यांचा निषेध

पत्रकारांकडून अधिकाऱ्यांचा निषेध

9
0

 

अहिल्यानगर – २२३, राहुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्रावर मीडियाला प्रवेश बंदी घालण्यात आल्याने पत्रकार बांधवांनी निषेध व्यक्त केला आहे.

माध्यम प्रतिनिधींना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मतमोजणी केंद्रात प्रवेशाचे अधिकार पत्र देण्यात आले होते. त्याला निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांनी केराची टोपली दाखविली. मतदान केंद्रात प्रवेश नाकारला. जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश दिला. परंतु, अवघ्या एक मिनिटात “तुम्हाला बाहेर काढावे लागेल.” असे अपमानास्पद बोलून बाहेरचा रस्ता दाखविला. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत प्रवेश बंदी कायम ठेवली. त्याचा माध्यम प्रतिनिधींनी तीव्र निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here