जालना – १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यूस पाजून मनोज जरांगे यांच उपोषण मागे घेण्यात आल.
कोणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही.नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.दरम्यान मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा व्हायरल व्हिडिओचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला.सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून अंतरवाली सराटी गावात आलोय.असे ते म्हणाले.
चांगल्या मुलाला जन्म दिला अस म्हणत मनोज जरांगे यांच्या वडिलांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल.
लाठी चार्ज प्रकरणातील अधिकाऱ्यांना निलंबित करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेची सरकार जबाबदारी घेणार आहे.
धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री तुम्ही आहात. 10 दिवस वाढून घ्या पण टिकणार आरक्षण द्या.असे मनोज जरांगे यांनी म्हंटले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागून आरक्षण घेणार आहे.माझं वाटूळ,राख रांगोळी झाली तरी चालेल,पण हटणार नाही.असे मनोज जरांगे पाटील ठामपणे सांगितले.