ब्राम्हणी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास छावा चित्रपटद्वारे सर्वांना पाहाता यावा यासाठी ब्राम्हणी गावात बुधवारी 12 मार्च रोजी सायं 7 वाजता ब्राम्हणी ग्रामपंचायतसमोर भव्य अशा एलएडी स्क्रीन द्वारे छावा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
ऐतिहासिक असा रंजक,थरारक व प्रेरणादायी छावा चित्रपट हा मराठा सम्राट छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. यात रश्मिका मंदन्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहेत. छावाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.मात्र, तीन आठवड्यापासून चित्रपटगृहात प्रेक्षकांची छावा पाहण्यासाठी तुफान गर्दी सुरू आहे.आपल्या ब्राम्हणी परिसरातील ग्रामस्थ,विद्यार्थी, लहान मुले, महिला,युवती,तरुण व ज्येष्ठ नागरिक यांना चित्रपट पाहता यावा यासाठी सकल हिंदू समाज व समस्त ग्रामस्थ ब्राम्हणी यांच्यावतीने बुधवारी सायंकाळी सर्वांना छावा चित्रपट दाखविण्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.