ब्राम्हणी : स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘ आजी – आजोबा दिन हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला .
यावेळी विविध खेळांच्या स्पर्धेत सहभागी होऊन नातवांसोबत आजी आजोबाही शाळेत रममाण झाले अनेकांना आपल्या बालपणीचे दिवस आठवले. ‘ लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या अभंगातील ओळींची आठवण झाली. नातवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट होण्यासाठी असे उपक्रम कुटुंबातील महत्वाचे आहेत.
स्वागतासाठी नातवांनी काढलेली सुबक रांगोळी,ओवाळण्यासाठी सजवलेल ताट,नातवंडांना कौतुकाने पाहणारे आजी आजोबा, व त्यांना पाहून आनंदाने फुलणारे नातवंडांचे चेहरे अशा अतिशय सुंदर व आनंददायी वातावरणात आजी आजोबांचे स्वागत करण्यात आले. सौ. मंदाकिनी बाळकृष्ण बानकर या प्रमुख पाहुण्या होत्या.दीपप्रज्वलन व स्वागत समारंभानंतर सर्व आजी आजोबांनी त्यांच्या नातवंडांनी चरणांची पूजा करून त्यांचे दर्शन घेतले.विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे तर आजी-आजोबांनी आपल्या नातवंडाबद्दल मनोगत व्यक्त केले. आजी व आजोबांसाठी संगीत खुर्ची, हरिपाठ,उखाणे स्पर्धा, मेहंदी आदी मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.प्राचार्य अश्विनी बानकर यांनी सर्वाचे आभार मानले