Home Blog 2024 मधील शेवटची शनि अमावस्या

2024 मधील शेवटची शनि अमावस्या

6
0

सोनई : श्री क्षेत्र शनिशिंगणापुरमध्ये सन २०२४ मधील शेवटच शनिअमायस्या यात्रा शनिवार (ता.३०) नोव्हेंबर रोजी आहे. यात्रेची पूर्वतयारी म्हणून प्रशासन, पोलीस यंत्रणा व देवस्थान विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न झाली. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीस सर्व विभाग प्रमुख व विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात नेवासेचे
निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये एस टी बसच्या फे-या, वाहनतळ, दर्शन व्यवस्था, आरोग्य यंत्रणा, हारवले, सापडले, व्यावसायिक दुकाना तसेच प्रसाद व महाप्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आले. देवस्थानच्या विभाग प्रमुखावर विविध सुविधांची जबाबदारी देण्यात आली.

बैठकीसाठी विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर, चिटणीस आप्पासाहेब शेटे व विश्वस्त उपस्थित होते. शनिशिंगणापुरचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ.रमेश जावळे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here