गणराज्य न्यूज ब्राम्हणी : बळीराजा संगे जो राबतो रात- दिन, सांग आम्हा कसे फेडावे सर्जा राजा तुझे ऋण असे म्हणत स्व.विलास बानकर स्कूलमधील बाल शेतकऱ्यांनी कष्टकरी बैलाप्रती कृज्ञता व्यक्त केली.
कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. L.k.g व U.k.g चे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते. मुलींनी नऊवारी साडी तसेच मुलांनी धोतर फेटा परिधान केलेला होता. मुलांना बैलाचे महत्त्व व आपल्या चालीरीती रूढी परंपरा समजण्यासाठी शाळेच्या प्रा.सौ. अश्विनी बानकर यांनी प्रत्यक्ष बैलांची विधिवत पूजा केली त्यांना गोडाचा नैवेद्य खाऊ घातला.