ब्राम्हणी : गावचे सुपुत्र व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक स्व. गंगाधर गोविंद हापसे यांचे उद्या बुधवार 21 रोजी प्रथम पुण्यस्मरण…!
त्यानिमित्त विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली….!
प्रथम पुण्यस्मरण निमित्त हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे किर्तन होणार आहे.तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हापसे परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
स्व. गंगाधर गोविंद हापसे यांनी सुरुवातीला तलाठी म्हणून मांजरी येथे काही काळ सेवा केली. जुन्या काळात सातवीनंतर शिक्षकाची नोकरी मिळत होती. त्यानुसार बानकरवाडीवस्तीवर शिंदे मामा यांच्या घरासमोरील मारुती मंदिरात खाजगी शिक्षक म्हणून पाच-सहा वर्ष सेवा केली. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात आले. झेडपीचे शिक्षक कर्मचारी म्हणून मानमोडी वस्ती शाळेत सुरुवात झाली. त्याकाळी पाचटाच्या छप्परात शाळा भरली.कठीण परिस्थितीत त्यांनी विद्यार्थांना शिक्षण दिले.अन् अनेक विद्यार्थी घडविले.त्यानंतर
डिग्रस येथे सर्वाधिक 12 वर्ष शिक्षण सेवा केली. त्यानंतर गणेगाव, चांदेगाव, उंबरे या गावातील शाळेत शिक्षक म्हणून काम केले.
31 डिसेंबर 1991 रोजी शिक्षण क्षेत्रातील सेवानिवृत्त झाली… पुढील आयुष्य प्रापंचिक व कुटुंबाला वेळ देण्यात घालविले.मात्र,गतवर्षी त्यांचे निधन झाले.आज त्यांचे कुटुंब कृषी,समाजकारण,धार्मिक, अध्यात्मिक कार्यात सक्रिय आहे.
मुलगा श्री. गोविंद हापसे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. ग्रीनअप परिवारासोबत अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान व्यवस्थापन अशी शेती करत आहे.एकूणच गुरुजींची शिकवण व संस्कार यानुसार कार्य सुरू आहे.
भाऊ पुंजाजी गोविंद हापसे यांचा संपूर्ण परिवार प्रत्येक कार्यात गुण्यागोविंदाने एकत्रित राहत आहे.