मिरी (गणराज्य न्यूज): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास छावा चित्रपटाद्वारे सर्वांना पाहाता यावा यासाठी मिरी गावात शनिवार 29 मार्च रोजी सायं 7.30 वाजता श्री चैतन्य कानिफनाथ मंदिरासमोर भव्य अशा एलएडी स्क्रीनद्वारे चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रारंभी अभिवादन करत महाआरती होणार आहे.ऐतिहासिक असा रंजक,थरारक व प्रेरणादायी छावा चित्रपट हा मिरी परिसरातील ग्रामस्थ,विद्यार्थी, लहान मुले, महिला,युवती,तरुण व ज्येष्ठ नागरिक यांना मोफत दाखविण्यासाठी श्री कान्होबा उर्फ चैतन्य कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, राजयोग लॉन्स व मंगल कार्यालय,मातोश्री फार्म ,शिव प्रेमी व शंभू प्रेमी मिरी ग्रामस्थ यांच्यावतीने शनिवारी रात्री 7.30 वाजता सर्वांना छावा चित्रपट दाखविण्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
चित्रपटासाठी : स्टेज मंडप सौजन्य आदिनाथ किसन सोलाट,जनरेटर व्यवस्था गोरक्ष संपत पाटील,साऊंड सिस्टिम दर्शन ऑडिओ व कोरडे बंधू तर,जाहिरात व फ्लेक्स सौजन्य मंडलअधिकारी संतोष प्रभाकर झाडे, शुभम ज्वेलर्स व चैतन्य कलेक्शन मिरी आदिकडून सहकार्य मिळत आहे.