Ahmednagar news: २५ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वंजारी महासंघ साहित्य आघाडी आयोजित पहिले मराठी साहित्य संम्मेलन.
अहमदनगर प्रतिनिधी(ललित मुतडक): वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी आयोजित पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संम्मेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल असून सदर संम्मेलन नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शक ठरेल असं मत आयोजन समितीच्या वतीने वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीच्या राज्य मार्गदर्शक सुप्रसिद्ध साहित्यिका विचारवंत, प्रकाशिका सौ.लता गुट्टे यांनी व्यक्त केले.संम्मेलनाच्या पूर्व संधेला ग्रंथदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून एकदिवसीय साहित्य संम्मेलन दिनांक २५/१२/२०२२ रविवार सकाळी ९:००ते १२:०० या वेळेत तीन सत्रांमध्ये पार पडेल.
पहिलं सत्र उद्घाटन सोहळा असेल.ज्यामध्ये दीपप्रज्वलनाने उद्घाटन होईल.अतिथींचे स्वागत सत्कार,प्रास्ताविक तसेच स्मरणिकेचे प्रकाशन होईल.तसेच राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांचे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सत्कार करण्यात येतील.ग्रामिण साहित्यिका स्वर्गिय सुंदराबाई आंधळे खांबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य रत्न समाज भुषण पुरस्कार २०२२ देऊन राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार सन्मान चिन्ह शाल श्रीफळ स्वरूपात असेल.या साहित्य संम्मेलनाला संम्मेलन अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत कवी प्रा.वा.ना.आंधळे हे लाभले आहेत.तसेच मार्गदर्शक म्हणून विदर्भ रत्न जेष्ठ साहित्यिक कादंबरीकार बाबारावजी मुसळे,प्रमुख उपस्थितीमध्ये वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक गणेश खाडे, सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन नाशिकचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.तुळशीदास महाराज गुट्टे लाभले आहेत.स्वागत अध्यक्ष प्रशांतजी आंधळे हे प्रयत्नशील आहेत.आयोजक म्हणून माझे सहकारी साहित्य आघाडीचे पदाधिकारी महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉ.सौ.शितल चोले नागरे,राज्य सरचिटणीस सौ.सिंधुताई दहिफळे,राज्य संघटक,सुषमा सांगळे वनवे, महिला युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अलकनंदा घुगे आंधळे साहित्य संम्मेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत राज्यातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यांची साहित्य संम्मेलनाला प्रमुख उपस्थिती असेल.
दुपारी एक ते दोन भोजन. २.१५ ते ३.१५ परिसंवाद ३.२० ते ४.३० कथाकथन. ४३० ते ५ संध्याकाळी ५.३० ते ७ कवीसंमेलन ७ ते ८ समारोप.अशाप्रकारे साहित्य संमेलनाचे दिवसभराचे वेळापत्रक असेल असेल.प्रमुख अतिथींच्या मनोगतातून ‘राष्ट्र निर्माणासाठी वंजारी समाजाचे साहित्यातील योगदान.तसेच सुसंकृत पिढी निर्मितीसाठी समाजाभिमुख साहित्य निर्मिती व्हायला पाहिजे यावर विचार मंथन. राष्ट्र पुरूष संत भगवान बाब,सद्गुरु श्री. वामनभाऊ यांनी समाज घडविण्यासाठी जे विचार परिवर्तन केले त्यावर वंजारी समाजाची जडणघडण झाली.ते विचार उद्याची भावी पिढीपर्यंत पोहोचविणे ही आजच्या यशस्वी सुशिक्षित लोकांचे कर्तव्य आहे.बाबांचे विचार अशा व्यासपीठांवरून आजच्या आणि उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचतील.सामाजिक परिवर्तन विकासातील साहित्याच योगदान वाढलं पाहिजे,व्यसनाधीनता, हुंडा पद्धती,वाढत्या कौटुंबिक समस्या,हे चिंतनाचे विषय असतील. अशा अनेक वेगवेगळ्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा चिंतन होईल राष्ट्र संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज संत आवजीनाथ महाराज व लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी दिलेली दिशा साहित्याच्या माध्यमातून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी अनेक मान्यवर साहित्यिक यांची लेखणी उपयोगी ठरेल.
Web Title: First Marathi Literary Conference organized by State Level Vanjari Mahasang Sahitya
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App