Home अहमदनगर सेवानिवृत्ती वेतनधारकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार

सेवानिवृत्ती वेतनधारकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार

173
0

सवानिवृत्ती वेतनधारकांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – कोहीनकर यांचे आश्वासन

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झेडपीत बैठक,मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार
नगर – मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांची बैठक संपन्न झाली .

सदर बैठकीस सर्व खातेप्रमुख जिल्हा परिषद अहदनगर तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते . संपूर्ण दिवस सर्व सेवानिवृत्ती वेतनधारक यांचे अडीअडचणी अधिकारी यांनी जाणुन घेतल्या . त्याबाबत ठोस कार्यवाही करणेबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवि यांनी आश्वासन दिले . पशुसवंर्धन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती विषयक प्रलंबित लाभांबाबत सविस्तर चर्चा होवुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवि यांनी बहुतांश अडचणी सोडविल्या . तसेच आरोग्य व पशुसवंर्धन विभागातील कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती विषयक लाभासाठी आवश्यक ते अनुदान प्राप्त करुन घेणेकामी उपमुकाअ साप्रवि यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले . जवळपास १५० सेवानिवृत्ती कर्मचारी सदर बैठकीस उपस्थित होते . अर्थ विभागाशी संबंधित सेवानिवृत्ती विषयक सर्व प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत अर्थ विभागास निर्देश देण्यात आले . सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सर्व मागण्यांबाबत ठोस आश्वासन देण्यात आले . सेवानिवृत्ती वेतनधारकांचे सर्व प्रश्न व आडआडचणी बाबत कालबध्द कार्यक्रम निश्चित करुन मुदतीत प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवि यांनी दिले . संघटनाच्या मागण्या व अडचणी सोडविण्यात बाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्रवि यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे संघटनांची बैठक खेळेमेळीच्या वातावरणात पार पाडली .

Previous articleब्राम्हणीत डांगोबा बाबांचा उत्सव
Next article११ ग्रामपंचायत निकालांकडे लक्ष
गणराज्य न्यूज संपर्क: [email protected] मोबाईल: 9730377511

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here