गणराज्य न्यूज राहुरी : अतिवृष्टीच्या काळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता मुळा धरणात जलसमाधी घेवून आंदोलन करणार आहे.
जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे . त्यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की , जिल्ह्यामध्ये १६ सप्टेंबर रोजी राहुरी तहसील यांच्या आदेशावरून सर्वच पंचनामे प्रत्यक्षात होऊन तलाठी , मंडलाधिकारी , कृषी सहाय्यक , ग्रामविकास अधिकारी यांनी ३१ ऑक्टोबर रोजी अहवाल वरीष्ठांना पाठवला आहे . हेक्टरी ४० हजार रूपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करावी , अन्यथा २१ डिसेंबर रोजी शेकडो शेतक – यांसमावेत मुळा धरणामध्ये जलसमाधी घेण्यात येईल अशा इशारा रवींद्र मोरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला होता.स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत शिवसेना कार्यकर्ते जलसमाधीसाठी मुळा धरणावर जाणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिली.