Home अहमदनगर आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत यश

आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत यश

120
0

ब्राम्हणी : परमपूज्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत स्व.विलास बानकर इग्लिश मिडीयम स्कूलच्या खेमनर ख़ुशी हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

प.पू.गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय पिंपरने येथे वकृत्व स्पर्धा पार पाडली.यामध्ये संगमनेर,नेवासा, राहुरी,राहता या तालुक्यातून 56 शाळेने सहभाग घेतला होता. स्व. विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गट 3 री ते 4थी मध्ये दोन, गट 5 वी ते 7 वी मध्ये दोन व गट 8 वी ते 10 वी मध्ये दोन असा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून 8 वी ते 10 वी गटातून स्व. विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी खेमनर ख़ुशी हिने तृतीय क्रमांक मिळविला असुन प्रमाणपत्र व रोख स्वरूपात ₹ 501 चे पारितोषिक बक्षिस मिळाले.याबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ.अश्विनी बानकर मॅडम यांनी खेमनर खुशीचे कौतुक केले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here