गणराज्य न्यूज राहुरी : आज बुधवार २१ डिसेंबर रोजी चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत ब्राम्हणीतील स्व.विलास बानकर स्कूलच्या ६ विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.
इयत्ता ३ ते ४ थी गटात यश बापूसाहेब ढेपे, वीरेंद्र प्रसाद बानकर तर ५ ते ७ वी गटात कार्तिकी उत्तम बानकर , पीया बाळकृष्ण येवले तसेच इयत्ता आठवी ते दहावी खुशी यशवंत खेमनर व ईश्वरी नंदू जाधव आदी स्पर्धकांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवला.
अभ्यासपूर्व व स्पष्ट शब्दात आपल्या विषयाची मांडणी स्पर्धक विद्यार्थ्यांनी करत परीक्षक व उपस्थिती श्रोते यांची मने जिंकली. यापूर्वी बनकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी आयोजित वकृत्व स्पर्धेत बक्षिसे मिळवली आहेत. आजच्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने प्राचार्य अश्विनी बानकर व शिक्षकांनी विशेष कौतुक केले.