गणराज्य न्यूज राहुरी : जिल्हाधिकारी व पोलीसांव्दारे दिलेले वैध आदेशाचे उल्लंघन करुन अचानक मुळा धरणाचे दिशेने जलसमाधी घेण्याकरता जावुन मुळा धरणाचे पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी.गु र .रजि नं.- 1322/2022 भांदवि कलम 188, मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) प्रमाणे स्वाभिमानीचे रविंद्र मोरे व शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर आज सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोकाँ/131 दादासाहेब दत्तात्रय़ रोहकले यांच्या फिर्यादीवरून 1)रविंद्र बापुसाहेब मोरे वय 39 वर्ष, रा.टाकळीमियाँ राहुरी जि.अहमदनगर, 2)राववसाहेब रामदास खेवरे वय 52 रा.देसवंडी ता.राहुरी, 3) भागवत बाळासाहेब निमसे वय 55 रा.देवळाली ता.राहुरी, 4)राहुल सिताराम चोथे वय 41 रा.टाकळीमियाँ ता.राहुरी 5)अब्दुल हमीद राज महंमद पटेल वय 54 रा टाकळीमियाँ ता.राहुरी , 6) विजय महादेव शिरसाठ वय 46 रा.राहुरी बुद्रुक ता.राहुरी 7) प्रशांत रामदास शिंदे वय 44 रा.ब्राम्हणी ता.राहुरी, 8) विशाल सुरेश तारडे वय 29 रा.केंदळ बुद्रुक ता.राहुरी , 9)कैलास एकनाथ शेळके वय 51 रा.राहुरी खुर्द ता.राहुरी , 10) सुनिल रामनाथ शेलार वय 43 वर्ष रा तांभेरे ता.राहुरी , 11)मिनानाथ बाळासाहेब पाचरणे वय 29 रा.रामपुरवाडी ता.राहुरी, 12)सुभाष मघाजी चोथे वय 52 रा.टाकळीमियाँ ता.राहुरी , 13)विठठल सोन्याबापु सुर्यवंशी वय 40 रा.मुसळवाडी ता.राहरी आदिवर गुन्हा दाखल करण्यात आला.