Home अहमदनगर संघर्षाचे यशात रूपांतर करण्यास शिका

संघर्षाचे यशात रूपांतर करण्यास शिका

130
0

 


सोनई प्रतिनिधी : यशवंत सामजिक प्रतिष्ठानच्या वतीने आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतुन नेवासा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले ‘करिअर मार्गदर्शक’ पुस्तकाचे प्रकाशन व विद्यार्थ्यांना करिअर कसे घडवावे याविषयी व्यख्यान कार्यक्रमाचे आयोजन शनी दि 6 जाने 2024 रोजी मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई येथे संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यख्याते प्रा विठ्ठल कांगणे तसेच सोनईचे भूमिपुत्र गणेश मिसाळ जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार,यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख,डॉ निवेदिता गडाख व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक बाबा अनारसे यांनी केले.याप्रसंगी करिअर मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशन व आ शंकरराव गडाख यांच्या वेबसाइटचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी बोलतांना उदयन गडाख म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास घरी करता यावा यासाठी ‘करिअर मार्गदर्शक’ पुस्तक तयार करण्यात आलेली आहे ते विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर मार्गक्रमण करावे आयुष्यात कुठलेही काम लहान अथवा मोठे नसते.आई वडिलांना प्रेरणास्थानी ठेवून काम करा.
असे उदयन गडाख म्हणाले.याप्रसंगी गणेश मिसाळ म्हणाले मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री शनिश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मनाला विशेष अभिमान आहे.यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धा परीक्षेला सामोरे
जातांना मार्गदर्शक म्हणून तयार करण्यात आलेले पुस्तक उपयुक्त आहे.त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच उपयोग होणार आहे.
याप्रसंगी बोलतांना प्रा विठ्ठल कांगणे म्हणाले
यशवंत प्रतिष्ठानने उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा पुस्तक तयार केलेले आहे ते उपयुक्त असेच आहे.मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना करिअर मार्गदर्शन करण्याचा व पुस्तक भेट देण्याचा उपक्रम दिशादर्शक असाच आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी मोबाइल पासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.ग्रामीण भाग व शहरी भाग हा न्यूनगंड बाळगू नका.जीवनात कुठलीही गोष्ट अशक्यप्राय नाही.
कामात सातत्य ठेवा.
आपल्या जवळ असलेल्या कौशल्याचा वापर करून सर्वोत्कृष्ट बना.
संघर्षाचे रूपांतर यशात करण्यास शिका असे प्रा विठ्ठल कांगने म्हणाले
पुस्तका निर्मितीस साह्य केल्याबदल गणेश लोंढे ,योगेश रासने व वेबसाईट डिझाईनबद्दल सौरभ मुनोत यांचा
सन्मान करण्यात आला.
राज्यभरतील नामवंत प्रकाशकांचे पुस्तक स्टॉल
व मुळा एज्युकेशन संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे व इतर संस्थेचे माहिती देणारे
स्टॉल
याप्रसंगी ठेवण्यात आले होते
यावेळी.
एकनाथ मिसाळ, अविनाश मिसाळ उपअधीक्षक भुअभिलेखक,सचिव उत्तमराव लोंढे,सहसचिव डॉ विनायक देशमुख,बाळासाहेब सोनवणे,बद्रीनाथ खंडागळे, देविदास जगताप,पत्रकार सुनील दरंदले, धनंजय वाघ,उदय पालवे,चंद्रकांत राऊत,सौरभ कांगुणे,महावीर चोपडा,स्वप्नील सोनवणे, अभिषेक बारहाते,संदीप लोंढे आदींसह यशवंत सामाजिक प्रतिष्ठान कार्यकर्ते विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी..
सोनई ता नेवासा करिअर मार्गदर्शक
पुस्तक प्रकाशन व व्यख्यान प्रसंगी बोलताना प्रा विठ्ठल कांगणे उपस्थित उदयन गडाख मान्यवर व विद्यार्थी
यशवंत सामजिक प्रतिष्ठानच्या वतीने
नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील तब्बल
10 हजार विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शक पुस्तक वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here