Home अहमदनगर सोनई पोलीस स्टेशनकडून पत्रकारांचा सन्मान

सोनई पोलीस स्टेशनकडून पत्रकारांचा सन्मान

131
0

गणराज्य न्यूज सोनई – दर्पणकार आचार्य बाळ शास्री जांभेकर जयंती निमित्त ६ जानेवारी रोजी सर्वत्र पत्रकार दिन उत्साहात साजरा होत असतो. त्याचे औचित्य साधुन सोनई पोलीस स्टेशनच्या वतीने सोनई परिसरातील पत्रकारांचा मंगळवारी सकाळी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी यांनी पत्रकारांचा सन्मान केला.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्रकारांचे कायम महत्वपूर्ण भूमिका असते.पोलीस व पत्रकारांचा समन्वय चांगला असल्याने काम करताना सहकार्य लाभते.असे मत पोलीस अधिकारी माणिकराव चौधरी यांनी व्यक्त केले.

यावेळी विनायक दरंदले, विजय खंडागळे,नवनाथ कुसळकर,अशोक भुसारी, अविनाश राऊत,रविंद्र शेटे,दिलीप शिंदे, संजय वाघ,मोहन शेगर,संतोष टेमक, संभाजी शिंदे,गणेश हापसे, सुरेश दारकुंडे, गणेश बेल्हेकर, सोपान भगत, सुरेश दारकुंडे, देविदास चौरे आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणराज्य न्यूज : संपादक गणेश हापसे यांचा सन्मान करताना पोलीस अधिकारी माणिकराव चौधरी…..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here