Home अहमदनगर राहुरी पोलिसांची कारवाई

राहुरी पोलिसांची कारवाई

199
0
  • राहुरी पोलिसांची कारवाई,उंबरे शिवारात १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीची लोखंडी स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी गजाआड
    राहुरी : तालुक्यातील उंबरे शिवारातील तांबे पेट्रोलपंपाशेजारील १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीची लोखंडी स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी राहुरी पोलिसांनी गजाआड केली.

राहुरी पोस्टे गु.र.नं। १ ९ ५६ / २०२२ भादवि कलम ३७ ९ प्रमाणे दाखल गुन्ह्यतील स्टील चोरी करणारे आरोपी व मुद्देमाल तात्काळ शोध घेणेबाबत पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग यांनी पोनि प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते .
सदर आदेशाप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनकडील पोनि / प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणेत आली आहे . नमुद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांनी राहुरी पोलीस स्टेशनकडील कारवाई करणेकामी पोसई खोंडे , सफौ / चंद्रकांत बऱ्हाटे , पोहेकॉ / दिनकर चव्हाण , पोहेकॉ / सोमनाथ जायभाय , पोना / अमित राठोड , पोकॉ / अदिनाथ पाखरे , पोकॉ / सचिन ताजणे , पोकॉ / संतोष राठोड , पोकॉ / गणेश लिपणे , पोकॉ / नदिम शेख पोकॉ / अमोल पडोळे यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते .
सदर बाबत पोनि प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि आरोपी नामे १ ) अभिषेक बाबासाहेब हुडे २ ) हर्षल दत्तात्रय ढोकणे दोघे रा.उंबरे ता.राहुरी यांनी गुन्हा केलेला आहे . गोपनीय माहीती मिळाल्याने सदर आरोपी यांना सापळा लावुन उंबरे शिवारात जेरबंद करुन त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा आम्ही व ३ ) जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे ४ ) छोट , उर्फ सौरभ संजय दुशिंग ५ ) राहुल दादु वैरागळ सर्व रा . उंबरे ता.राहुरी जि . अनगर असे आम्ही मिळुन केल्याची कबुली दिली आहे . सदर आरोपी यांनी गुन्ह्यातील एकुन मुद्देमाल १२ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील व गुन्हा करणेकामी वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर , TATA कंपनीची ACE मॉडेलची गाडी हे आरोपींनी दाखवल्याने वरील मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे . सदरची कारवाई मा . श्री राकेश ओला सो , पोलीस अधिक्षक , अ.नगर , श्रीमती स्वाती भोर मॅडम , अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर भाग व श्री संदिप मिटके सो , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे .

 

Previous articleअनाथांची सेवा, हीच खरी ईश्वर सेवा
Next articleनवीन तूर वाण पीक पाहणीचा कार्यक्रम उत्साहात
गणराज्य न्यूज संपर्क: [email protected] मोबाईल: 9730377511

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here