शालेय पोषण आहाराबाबत समाधान
राहुरी : तालुका भरारी पथकामार्फत जिल्हा परिषद प्राथशाळा ब्राम्हणी शाळेची शालेय पोषण आहार तपासणी करण्यात आली. भरारी पथकाचे प्रमुख व राहुरी तालुक्याचे बीडीओ बाळासाहेब ढवळे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान केंद्रपातळी विविध गुणदर्शन स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या मुलांना प्रमाणपत्राचे व पुरक आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना बिडिओ यांनी सांगितले,की माझे शिक्षण Z P शाळेत झालेले असून ते इ.४ थी व ७वी शिष्यवृत्ती परिक्षेत मेरिटमध्ये आले होते. यावेळी शालेय पोषण आहार अधिक्षक साळुंके साहेब,सोसायटीचे चेअरमन सुरेश बानकर, ग्रामसेवक माणिक घाडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महावीर चंगेडे,शाळेचे मुख्याध्यापक रामदास कोरडे व ग्रामस्थ व सर्व शिक्षक उपस्थित होते.