सोनई : मुळा एज्युकेशन संस्थेच्या शनिश्वर माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण समारंभ व शिवचरित्रकार राहुल पेरणे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य’ या विषयावर व्याख्यान झाले.
स्त्रीभ्रूण हत्या, व्यसन, आई,वडिलांची सेवा आदी बाबत प्रबोधन केले. निर्जीव वस्तूंच्या एकजुटीतून घर ऊभे राहत असल्याचे सांगून त्यांनी चांगल्या कामासाठी सजीव व्यक्तींनी एकजुट होणे आवश्यक असल्याचे व्याख्याते पेरणे यांनी सांगितले.
विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशनचे सचिव उत्तमराव लोंढे होते.यावेळी प्रशासन अधिकारी डाॅ.अशोक तुवर, मुळा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, व्यवस्थापक व्ही.के भोर, एल बी बारगळ, स्कुल कमेटी सदस्य विनायक दरंदले,माजी सरपंच राजेंद्र बोरुडे,सदस्य सखाराम राशिनकर,सविता राऊत,श्वेताली दरंदले,शुभांगी बडे,द्वारकाभाभी कुमावत, इंदुमती खंडागळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भिमराज खोसे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. यानंतर झालेल्या व्याख्यानात शिवचरित्रकार राहुल पेरणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ते स्वराज्याची स्थापनेचा प्रसंग अतिशय सुंदर पध्दतीने मांडला. इतिहासाचा दाखला देवून त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, व्यसन, आई,वडिलांची सेवा आदी बाबत प्रबोधन केले. निर्जीव वस्तूंच्या एकजुटीतून घर ऊभे राहत असल्याचे सांगून त्यांनी चांगल्या कामासाठी सजीव व्यक्तींनी एकजुट होणे आवश्यक असल्याचे सांगितले. बी एस दरंदले यांनी सुत्रसंचालन केले. संगीता भालसिंग यांनी आभार मानले.