मोकळ ओहोळमध्ये स्वस्त धान्य दुकान सुरू
गणराज्य न्यूज ब्राम्हणी : गत अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या राहुरी तालुक्यातील मोकळ ओहोळमध्ये स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यात आले. रविवार २५ डिसेंबर रोजी डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
रेशन कार्डधारकांना यापूर्वी धान्य आणण्यासाठी शेजारच्या दुसऱ्या गावाला जाव लागत असे. त्यामुळे मोकळ ओहोळ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. लोकांची गैरसोय होऊ नये व त्यांना त्यांच्या गावातच स्वस्त धान्य मिळावे म्हणून सुभाषराव पाटील व राहुरी कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह सुभाषराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मोकळ ओहोळ येथील नागरिकांना स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देण्यात आले.
उद्घाटन शुभारंभ प्रसंगी सरपंच भानुदास कदम,चेअरमन
कारभारी कदम,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल कदम, बाळासाहेब औटी,राजेंद्र कदम, गोरक्षनाथ येवले, कैलास कदम,ज्ञानदेव कदम सोसायटीचे संचालक, आजी- माजी सरपंच -उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.