गणराज्य न्यूज ब्राम्हणी – प्रसिद्ध शिंदे मामाची मावा कुल्फी आता ब्राह्मणी गावच्या बस स्टॅन्डवर लोकप्रिय विरभद्र टी हाऊसमध्ये मिळणार आहे.
कुल्फी म्हटल की शिंदे मामाची मावा कुल्फी सर्वांना आठवते.एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावीशी वाटते..अशी मावा कुल्फी….आता ब्राह्मणी गावात मिळणार असल्याने खवय्यांसाठी मोठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
वीरभद्र टी सेंटरच्या माध्यमातून व्यवसायात वाटचाल करणारे यशस्वी कर्तबगार युवा व्यावसायिक यांनी गत काही दिवसापूर्वी थंडगार शीतपेये व केक हाऊस सुरू केले. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद त्याला चांगला प्रतिसाद मिळत असताना पुन्हा एक नवीन पाऊल शिंदे मामा मावा कुल्फीच्या रूपान आता अवि वाकडे यांनी टाकलं. सर्वांना हवीहवीशी वाटणारी गुल्फी आता ब्राह्मणी गावी दाखल झाल्याने लहान लेकरांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांच्या आता मज्जाच मज्जा होणार आहे.
इंदापूरची प्रसिद्ध मामा कुल्फी पुणे व सोलापूर जिल्ह्यात फेमस आहे.ती आता नगर जिल्ह्यात काही भागात दाखल होत असताना ब्राह्मणी गावाला मान मिळाला.
पंढरपूरकडे जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना शिंदे मामाची कुल्फी खायलाच मिळते. त्याच विठ्ठल भक्तांच्या अग्रस्तव आता तीच कुल्फी ब्राह्मणीत मिळणार आहे….