गणराज्य न्यूज पुणे : शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे खराडी स्पोर्ट क्लब आयोजित सहाव्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सोनईच्या किड्स किंग्डम अकॅडमी विद्यालयाचा इयत्ता ७ वी चा विद्यार्थी विक्रम विजय बानकर याने ५५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
या यशाबद्दल प्राचार्य कीर्ती बंग व स्कूलच्या सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.यासाठी महादेव जाधव सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विक्रम बानकर यास आजोबा रंगनाथ बानकर व वडील विजय बानकर यांनी या स्पर्धेसाठी बालवयातच पाठिंबा दिला.त्या जोरावर विक्रम बनकर याने आज पर्यंत शाळास्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राष्ट्रीय स्तरीय अशा विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवल. भविष्यात राज्य व देशासाठी खेळण्याच त्याचा स्वप्न आहे.