गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी जिल्हा परिषद शाळेत उद्या शुक्रवार ३० रोजी तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बाल गोपाळाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राहुरीचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन गारुडकर यांनी केले आहे.

केंद्रस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेत पाहायला मिळणार आहे.
