राहुरी : तालुका गुरुमाऊली २०१५ मंडळ, ऐक्य मंडळ, शिक्षक भारती व एकल मंच आघाडीच्या वतीने उत्कृष्ट कार्यसेवेबद्दल प्रभारी गटशिक्षणाधिकारी अर्जुन गारुडकर, शा.पो.आहार अधिक्षक हेमंत साळुंखे साहेब यांचा सन्मान करण्यात आला.राहुरी तालुक्यात नव्याने हजर झालेले गोरक्षनाथ नजन साहेब यांचा स्वागत सन्मान सोहळा कार्यक्रम पार पडला. यापूर्वी ग.शि अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणारे श्री अर्जुन गारुडकर साहेब यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्य सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री साहेबराव अनाप हे होते.
सूत्रसंचालन विकास मंडळाचे माजी विश्वस्त तथा आदर्श शिक्षक श्री विठ्ठलराव काकडे यांनी तर आभार गुरुमाऊली मंडळाचे तालुका अध्यक्ष श्री निवृत्ती धुमाळ यांनी मानले. जिल्हा कोषाध्यक्ष श्री रविकिरण साळवे यांनी अध्यक्ष निवड व अनुमोदन शिक्षक भारती तालुकाध्यक्ष श्री पाराजी मुसमाडे यांनी दिले. सदर प्रसंगी विकास मंडळाचे विश्वस्त श्री चांगदेव काकडे आणि विश्वस्त श्रीमती उर्मिला राऊत/हजारे मॅडम यांचे पती श्री पंडितराव हजारे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षण प्रक्रियेचे महत्त्वाचे ध्येय असून त्यांना शिकवणारा शिक्षक हा माहिती मुक्त व आनंददायी असला पाहिजे, तरच ते दर्जेदार शिक्षण होते. शिक्षकांनी प्रामाणिकपणाने बजावलेल्या सेवेमुळे स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल होतो. विद्यार्थ्यांसाठी केलेली सेवा स्वतःचे जीवन समृद्ध करण्यास प्रभावी ठरते, असे प्रतिपादन नूतन गटशिक्षणाधिकारी श्री गोरक्षनाथ नजन यांनी केले. श्री अर्जुन गारुडकर साहेब यांनी शिक्षक संघटनेने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानले. शिक्षण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रशासनाला शिक्षक संघटनेची गरज असून त्यांचे प्रश्न सोडविण्यात आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी शा.पो.आहार अधिक्षक श्री साळुंखे साहेबांचा सन्मान करण्यात आला.
🔸शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री मुकेश गडदे यांनी पंचायत समिती आणि शिक्षकांचे प्रश्न याविषयी विवेचन केले. शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली तर त्यांचा निश्चित उत्साह वाढतो असे मत व्यक्त केले. गुरुमाऊली मंडळाच्या महिला आघाडीच्या जिल्हा नेत्या श्रीमती नीलिमा गायकवाड यांनी चांगली सेवा केलेले गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा शिक्षकांच्या आजही स्मरणात असल्याने शिक्षण प्रक्रियेत नूतन गटशिक्षण अधिकाऱ्यांना निश्चित मोलाची साथ देऊ, अशी भूमिका मांडली.
ऐक्य मंडळ तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी राहुरी तालुक्यातील प्रत्येक शाळा व प्रत्येक शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यांचे प्रश्न तालुकास्तरावर सुटावे व शिक्षकांना यापुढेही असेच उत्साही काम करण्याची संधी मिळावी, असे मत व्यक्त केले. शिक्षक बँकेचे संचालक श्री गोरक्षनाथ विटनोर यांनी शिक्षकांची प्रलंबित सेवा पुस्तके, शिक्षकांना दिली जाणारी अतिरिक्त कामे, दररोज ऑनलाईन माहित्यांचा भडीमार यासंदर्भात शिक्षकांना मुक्त केल्यास शिक्षण प्रक्रिया आनंदी व भयमुक्त होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साहेबराव अनाप यांनी आघाडीचे सर्वच पदाधिकारी आपल्या शैक्षणिक कामात कसलीही कसर न ठेवता प्रत्येकजण शाळेत कार्यरत असतात. ते केवळ शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भातच आपल्याकडे येऊन दाद मागतात त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात आपण नेहमी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास आघाडीचे आपणास नेहमीच सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.
🔸यावेळी वैद्यकीय क्षेत्रात श्री जनार्दन काळे यांची कन्या कु. वैष्णवी, श्री तुकाराम वायाळ सरांचा चिरंजीव गणेश तसेच श्री राजाराम वने सरांची पुतणी कु.भक्ती विजय वने यांची निवड झाल्याबददल त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या गोपाळवाडी शाळेच्या शिक्षकांचा तसेच तंत्रस्नेही शिक्षक श्री संजय तेलोरे, साधन व्यक्ती श्री तांदळे, श्री उजागरे यांचाही सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले श्री विठ्ठलराव काकडे यांना नूतन गटशिक्षण अधिकारी नजन यांनी पुरस्काराचे वितरण करून सन्मानित केले.
🔸सदर प्रसंगी गुरुमाऊली महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा राणीताई साळवे, तुळजा भांड, कुलकर्णी मॅडम, रणदिवे मॅडम, गायकवाड मॅडम, गडाख मॅडम, सौ लाटे मॅडम, मार्गदर्शक श्री कल्याणराव राऊत, श्री डफळ सर, अशोक चौधरी, हनुमंत चौधरी, राजेंद्र वने, विशाल खंडागळे, संजय पाखरे, बाबासाहेब चव्हाण, संतोष गवळी, दिलीप वर्पे, दादासाहेब रोहोकले, राहुल खराडे, शिवाजी वाघ, अरुण ढोकणे, संदीप शेळके, संजय ढेरे, मंगेश पंडित, मुकुंद शिंदे, राहुल म्हस्के, संतोष गिरगुणे, सचिन गायकवाड, संजय लाटे, दिनेश टाकसाळ, खंडू बाचकर, प्रभू बाचकर, गोरक्षनाथ साळवे, नारायण सरोदे, संतोष गिरगुणे, नामदेव दातीर, अय्याज सय्यद, बाबासाहेब नागरगोजे, विशाल भोंडवे, विठ्ठल बर्डे, गोरक्षनाथ जेजुरकर, मनोज देशमुख,आबासाहेब दळवी, दत्तात्रेय वर्पे, तुकाराम वायाळ, अरुण मुंढे, संपत तमनर, बाबासाहेब म्हस्के, अनिल हापसे आदी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.