गणराज्य न्यूज राहुरी – पंचायत समिती शिक्षण विभाग, राहुरी तालुका विज्ञान गणित चित्रकला संघटना व स्व.विलास बानकर इंग्लिश मिडीयम स्कूल,ब्राम्हणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान – गणित प्रदर्शनात आदर्श विद्यालय गौरव प्रशांत शिंदे याने तृतीय क्रमांक मिळवला.
विज्ञान गणित प्रदर्शन समारोप कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. आदर्श विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब जाधव,सुरेश जगदाळे सर, कल्हापुरे सर यांचे गौरवला मार्गदर्शन लाभले.
आदर्श विद्यालयाकडून सर्व शिक्षकांच्या वतीने गौरवचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांचे चिरंजीव आहेत.