गणराज्य न्यूज ब्राम्हणी – येथील पंढरी प्रतिष्ठान संचलित स्व.विलास बानकर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांची राहुरी तालुका वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
डॉ.एस.एस गाडे व डॉ.पी. एस चुत्तर यांच्या टीमकडून मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सर्व विद्यार्थांचे बॉडी चेकप करून आहाराबद्दल व आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी.सदृढ आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व आदी बद्दल बहुमोल मार्गदर्शन केले.
शाळेच्या वतीने प्राचार्य अश्विनी बानकर यांनी स्वागत करून सत्कार केला. विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केल्याबद्दल स्कूलच्या वतीने आरोग्य विभागाचे आभार मानण्यात आले.