गणराज्य न्यूज ब्राम्हणी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी-केंदळ व उंबरे तिन्ही गावांच्या सरहद्दीवर असलेल्या टेंभी येथील जागृत व सर्वांचे श्रद्धास्थान श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त १९ ते २६ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज सायं ७ ते ९ यावेळेत ज्ञानेश्वर महाराज काकडे, भागवत महाराज उंबरेकर, दिगंबर महाराज पुरणगावकर, निवृत्ती महाराज देशमुख, अविनाश महाराज शास्त्री, स्वामी प्रकाशनंदजी महाराज गिरी, आदिनाथ महाराज लाड आदी नामांकित महाराज मंडळींची कीर्तने होणार आहेत. २५ जानेवारी रोजी गणेश जयंती निमित्त रामायणाचार्य मनोहर महाराज सिनारे यांचे सकाळी १० वा. कीर्तन होईल.तर,२६ जानेवारी रोजी सकाळी श्री कृष्ण कृपांकित भागवताचार्य विकासनंदजी महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.
ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व कृष्णा महाराज जिरेकर व रामदास महाराज जरे तर, सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे व पत्रकार गणेश हापसे करणार आहेत. सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रमाचा गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात येत आहे.