नगर – शहरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी दोन गटांमध्ये तुफान हाणामाऱ्या झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा आज 19 जानेवारी रोजी नगर शहरातील नगर कॉलेजमध्ये शुल्लक कारणावरून दोन गटात तुफान हाणामाऱ्या झाल्या.
नेमकं हाणामाऱ्याचं कारण समोर आलं नाही सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये वाद करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.