Home राहुरी राहुरीत आज `खेळ पैठणीचा`

राहुरीत आज `खेळ पैठणीचा`

22
0

गणराज्य न्यूज राहुरी – शहर व तालुक्यातील महिलांसाठी आज बुधवार 7 फेब्रुवारी रोजी पांडुरंग लॉन्स येथे 5 ते 8 वाजेदरम्यान खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे,ओजस्विनी पतसंस्थेच्या चेअरमन सुजाताताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राहुरीतील खेळ पैठणीचा कार्यक्रम महिला भगिनींसाठी आपल्या नित्य नियमाच्या प्रापंचिक टेंशन मधून थोडासा करमणुकीचा प्लॅटफॉर्म ठरणार आहे.

एक दिवस महिलांसाठी महिलांच्या आनंदासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.तरी राहुरी शहर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे.असे आवाहन निमंत्रक सोनालीताई प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी पैठणी साड्या सह सोन्याची नथ, मिक्सर, प्रेशर कुकर असे एक ना अनेक आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here