ब्राम्हणी : ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दिपाली रवींद्र वैरागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
लोकनियुक्त सरपंच प्रकाश बाळकृष्ण बानकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल ठूबे,बाबासाहेब गायकवाड,शिला साठे,गिरिराज तारडे,नितीन हापसे, शशिकांत तेलोरे, ताराबाई वाकडे, मिरा गोरे, सुवर्णा गवांदे, सविता पुंड आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दिपाली वैरागर यांचा सर्व सदस्यांनी सत्कार केला. यावेळी माजी सरपंच बाळकृष्ण बानकर , प्रभाकर हापसे, ग्राम विकास अधिकारी माणिक घाडगे,पंडित हापसे,माणिक गोरे, दत्तात्रय पुंड, कचरू वाकडे, संतोष हापसे आदी उपस्थित होते.
माझ्यावर जनसेवा मंडळाने व सहकारी सदस्यांनी जो विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभाग क्रमांक तीनसह संपूर्ण गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. महिलांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.अशी प्रतिक्रिया नूतन उपसरपंच दिपाली वैरागर यांनी निवडी दरम्यान दिली.
राहुरी तालुक्यात ब्राह्मणी ग्रामपंचायतच काम खूप समाधानकारक आहे. भविष्यात आणखी विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जनसेवा मंडळाचे नेते बाळकृष्ण बानकर म्हणाले.