राहाता : तालुक्यातील केलवड येथील ग्रामदैवत विरभद्र महाराजांची यात्रा उत्सहात पार पडली.
महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कुस्ती आखाडा पार पडला. यावेळी बोलतांना ना. विखे पाटील म्हणाले, यात्रेचे नियोजन यात्रा कमिटीने, ग्रामस्थांनी चांगले केले. यात्रे निमित्त गाव एकत्र येते. कायम गुण्यागोविंदाने रहा,गावाचा विकास व्हावा, या भागातील शेतकरी सुखी व्हावा. परिसराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे विखे पाटील म्हणाले.
यात्रा यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कचरू वैद्य, सदस्य गवराम वैद्य, भारत राऊत,सचिन घोरपडे, काळू रजपूत, चंद्रकांत गमे,गंगाराम वैद्य,एकनाथ राऊत,सोपान वैद्य, साळबा कांदळकर,मच्छिंद्र गमे, बबन गोडगे, साहेबराव गमे, बाळासाहेब गमे,महादू राऊत आदींनी परिश्रम घेतले. कुस्ती मैदानाने यात्रेची सांगता झाली.यावेळी परिसरातील नामांकित मल्लांनी हजेरी लावली. डाव प्रति डावाची रंगत पहायला मिळाली.
कुस्ती मैदानाचे समालोचन राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावचे प्रसिध्द निवेदक गणेश हापसे यांनी केले. राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक एस. बी. नरोडे व टिम बंदोबस्तासाठी होती.