ब्राम्हणी – गावातील आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विकास कामासाठी व नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी आदर्श विद्यालयाच्या उत्तर दिशेच्या कोपऱ्याला देवी मंदिराच्या बाजूकडील रस्त्यालगत असणाऱ्या मोकळ्या जागेचा गाळे बांधकामासाठी उद्याच्या मंगळवारी जाहीर निलाव करण्यात येणार आहे.

बुधवारी 15 रोजी सकाळी पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांची बैठक पार पडली यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सदर जागी जाहीर लिलाव होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे…
शाळा विकास निधीसाठी सदर जागेचा जाहीर लीलाव करण्यात येत आहे.
अटी व शर्ती पुढील प्रमाणे
गाळा लिलाव प्रक्रियेत सहभागी होवून बोलीसाठी 21 हजार रुपये अनामत रक्कम दिनांक २० फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावी.
सहभागी बोलीधारकापैकी कोणीही जागा घेवो अथवा न घेवो 21 हजार रुपये पैकी एकविशे रुपये शाळा विकास निधीसाठी कपात करण्यात येणार आहे. अनामत रक्कम माघारी घेताना शाळेसाठी 2100 रुपये निधी आपल्याला जमा करायचा आहे.
बोली बोलताना 50 हजार रुपयांच्या पुढे बोलायची आहे.बोली एक हजार रुपयांच्या पटीतच बोलावी लागेल. उदा.51 हजार बोलल्यावर दुसऱ्याला व्यक्तीला 52 हजार बोलावे लागेल.
सदर जागेची भाडे ५०० प्रति महिना असेल. गाळा एका कुटुंबातील एका व्यक्तीला घेता येईल. बोलीत सहभागी व्यक्ती ब्राह्मणीचा रहिवासी असावा… अशा अटी शर्ती आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा.. सदर अनामत रक्कम ही संबंधित जाहीर करण्यात येत असलेल्या अकाउंट क्रमांकाला भरण्यात यावी.
सदर जागेचा लिलाव करून सदर रक्कम शाळा विकास व नवीन वर्ग खुल्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे. जे व्यक्ती गाळा बांधकामासाठी जागा घेतील त्यांना सदर जागी नेमकी कशा प्रकारे बांधकाम करायचे .. या अटी शर्तीच्या अधिक राहून बांधकाम करावे लागणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी….