सोनई : स्मार्ट किड्स अकॅडमीच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त लक्ष 2023 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. पालक व सोनई ग्रामस्थ, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य सोनल परेश लोढा यांनी केले आहे.
सोनई शनिशिंगणापूर रस्त्यालगत स्मार्ट स्पीड अकॅडमीच्या नियोजित भव्य स्कूलच्या मैदानात सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गट पंधरा दिवसापासून कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू आहे. भव्य मंडप व्यासपीठ व आणखी आकर्षक सजावट कार्यक्रमादरम्यान करण्यात आली आहे.
नाशिकचे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष युवा नेते उदय गडाख, सोनई पोलीस ठाण्याचे एपीआय माणिक चौधरी, व्याख्याते इंद्रजीत माने आदी उपस्थित राहणार आहेत. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव द्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख परेश ओमप्रकाश लोढा यांनी केले आहे.