Home अहमदनगर 8 मार्च रोजी ब्राम्हणीत : होम मिनिस्टर

8 मार्च रोजी ब्राम्हणीत : होम मिनिस्टर

146
0

राहुरी : जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी ब्राम्हणीत सायंकाळी 5 वाजता महिला भगिनींसाठी आवडता खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला.असल्याची माहिती ब्राम्हणीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा सुरेशराव बानकर यांनी दिली.

कार्यक्रमासाठी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ.धनश्रीताई सुजय विखे पाटील व सौ. प्रियंकाताई अक्षय कर्डिले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त एक दिवस महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ,गाणी,गप्पा,उखाणे, प्रश्नमंजुषा आदी विविध कार्यक्रम होणार आहेत.दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.तर, महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळाचे सादरीकरण झी टॉकीज फेम,मिमिक्री आर्टिस्ट संदीप जाधव हे करणार आहेत.

कार्यक्रमात सहभागी महिलांच्या नावाचा लकी ड्रॉ करण्यात येणार आहे. महिलांनी कार्यक्रम एन्ट्री करताना आपल्या नावाची चिठ्ठी बॉक्समध्ये टाकणे आवश्यक आहे.

प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.अंतिम स्पर्धेतील विजेत्या 3 महिलांना मानाची पैठणी मिळणार आहे. 8 मार्च रोजी जन्मदिनांक असणाऱ्या महिलांचा वाढदिवस कार्यक्रम स्थळी साजरा करण्यात येणार आहे. ज्यांचा वाढदिवस आहे.त्यांनी कार्यक्रमापूर्वी नावे द्यावीत. महिलांसाठी एक दिवस आनंदाचा सोहळा…असे आवाहन सरपंच सौ. सुवर्णा बानकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here