सोनई : स्मार्ट किड्स अकॅडमीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त लक्ष 2023 कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते उदय गडाख,यज्ञेश्वर महाराज,एपीआय माणिक चौधरी, इंद्रजीत माने, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड,डॉ. व्यवहारे,डॉ. मरकड ,पत्रकार विनायक दरंदले, उदय पालवे, संजय गर्जे, गणराज्य न्युजचे संपादक गणेश हापसे,डॉ. तुषार दराडे, मुळा कारखान्याचे संचालक रंगनाथ रौंदळ आदी उपस्थित होते.
संस्थेचे प्रमुख परेश लोढा व सोनल लोढा यांनी सर्वांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिकचे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांना लोणी येथील महसूल परिषदेमुळे उपस्थित न राहाता आल्याने त्यांनी थेट व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित पालक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान स्मार्ट किड्स अकॅडमीच्या कार्याचं कौतुक केले. स्कूलसाठी पुस्तके भेट देऊन करण्याचे कबूल केले.
स्मार्ट किड्स अकॅडमीच्या नूतन जागेत स्कूलचे बांधकाम सुरू करण्यात आल आहे. आगामी शैक्षणिक वर्षात काम पूर्ण होईल.असे संस्थेचे प्रमुख परेश लोढा यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान आयोजित गणित विज्ञान प्रदर्शनाची पाहणी युवा नेते उदय गडाख यांनी केली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रत्येक उपकरणाची माहिती जाणून घेतली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली.एकास एक एक असे नृत्य सादर करत सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केलं.दरम्यान स्कूलचे भविष्यातील प्लॅन, वर्षभरातील विविध उपक्रम, कार्यक्रम स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात आले.
इंद्रजीत माने यांनी पालक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या अडचणी, पालक विद्यार्थी समन्वय आदी बाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी पालक विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर भेटी देवून मस्त खाण्याचा आनंद लुटला.
पृथ्वीराज सोनवणे,श्वेता बानकर,श्रेया दरंदले ,रिदांश लोढा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य सोनल लोढा यांनी आभार मानले.