राहुरी : राहुरीचे ग्रामदैवत खंडेराय देवस्थान यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी अशोक वामन तर उपाध्यक्षपदी हरिभाऊ उंडे व आकाश येवले यांची एकमताने निवड करण्यात आली. खंडेराया देवस्थान यात्रा कमिटीच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ सदस्य संभाजीराजे तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली.
यावेळी यात्रा उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. मागील सभेचे इतिवृत्त रामदास बोरुडे यांनी वाचन केले. सचिव म्हणून नयन शिंगी, उपसचिव गवराज तनपुरे, खजिनदार अमोल तनपुरे, उपखजिनदार गणेश खैरे यांची एकमताने निवड करण्यात आली. खंडेराया यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे चार दिवस साजरा करण्यात येणार असून रहाट पाळणे, बारा गाड्या तसेच नामवंत मल्लांच कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
.
यावेळी बैठकीसाठी राजेंद्र उंडे, सुधीर तनपुरे, दिनकर पवार, सदाशिव शेळके, शिवाजी डौले, कारभारी डौले, दिलीप राका, साहेबराव डावखर, नवनाथ पवार, शिवाजी वराळे, भाऊसाहेब भुजाडी, विजय भुजाडी, आर. आर. तनपुरे,दत्तात्रय येवले,कांतीराम वराळे, शांताराम शेटे,संजय नांदे,पाराजी तनपुरे, अशोक उंडे, नाना शिरसाठ, गोरख चव्हाण, सचिन तनपुरे, सदाशिव शेळके,जगन्नाथ भिंगारकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.