ब्राम्हणी : यंदाचा प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव आगळावेगळा व उत्साहात पार पडण्यासाठी उद्या ब्राह्मणी गावातील श्रीराम मंदिरात पूर्वतयारी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पूर्वतयारीचा श्री गणेशा नारळ फोडून करण्यात येणार आहे. तरी सर्व श्रीराम भक्त व ग्रामस्थांनी विशेषता गावातील सर्व तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.