आज पासून श्रीहरी आपल्या सेवेत
वांबोरी : परिसरातील खवय्यांच्या सेवेत आजपासून हॉटेल श्रीहरी सज्ज होत आहे.
आज रविवार २६ रोजी सायं ७ वाजता शुभारंभ होत आहे.स्व. सुदाम शेटीबा कुसमुडे,स्व.बाबासाहेब नाथा आवारे यांच्या आशीर्वादाने सुरू होत असलेल्या हॉटेल श्रीहरीचे उद्घाटन श्रीमती अलका सुदाम कुसमुडे व आशाबाई बाबासाहेब आवारे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत असल्याची माहिती श्रीहरीचे संचालक बंटी सुदाम कुसमुडे व दीपक बाबासाहेब आवारे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.
विश्वासाला जपणारी माणसं या ब्रीदवाक्यप्रमाण हॉटेल श्रीहरी ग्राहकांच्या सेवेत राहणार आहे.
हॉटेल व्यवसायातील यापूर्वीच्या अनुभवाचा उपयोग आता प्युअर व्हेज खवय्यांसाठी होणार आहे.
प्युअर व्हेज जेवण व्यवस्थित मिळावे. स्वच्छता क्वालिटी माणुसकी हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हॉटेल श्री काम करणार आहे.