राहुरी : तालुका ग्रामसेवक संघटनेच्याअध्यक्षपदी ब्राम्हणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी माणिकराव घाडगे तर, सचिव पदी सुरेश डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेचे नेते एकनाथराव ढाकणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली.
नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष – माणिक घाडगे,सचिव – सुरेश डोंगरे,उपाध्यक्ष विठ्ठल जगताप,सहसचिव – राजेंद्र बोठे- महिला उपाध्यक्ष – सौ.वनिता कोहकडे, कोषाध्यक्ष – रवींद्र लांबे,संघटक -सचिन कल्हापुरे,उपाध्यक्ष राजेंद्र पवार – सल्लागार,मुरलीधर रगड यांची निवड करण्यात आली.
यावेळी बाळासाहेब आंबरे, राजेंद्र पावसे, मंगेश पुंड, शहाजी नरसाळे, रमेश बांगर, बाळासाहेब गागरे, दादासाहेब भिंगारदे,श्रीकांत साळी, अशोक खळेकर,अरुण वाघमारे, प्रभाकर चव्हाण, हर्षद पारधी, बाबासाहेब भोसले,सुनील नागरे आदी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष माणिकराव घाडगे यांची कामगिरी संघटनात्मक पातळीवर व ग्रामविकास अधिकारी म्हणून कायम उत्कृष्ट राहिली आहे. अध्यक्षपदासाठी संघटनेकडून त्यांच्या नावावर प्रथम संमती दर्शविण्यात आली.
कोरोना काळात ब्राह्मणी ग्राम विकास अधिकारी म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत जनमानसात त्यांनी नावलौकिक मिळवले. अध्यक्षपदी निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.