ब्राम्हणी : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज निमित्त ब्राम्हणीतील घेरूमाळ वस्तीवर अखंड हरिनाम सप्ताहात भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार २ मार्च ते गुरुवार ९ मार्च या दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ९ भागवताचार्य आदिनाथ महाराज हारदे यांच्या वाणीतून कथा ज्ञानयज्ञ सोहळा पार पडणार आहे.९ मार्च रोजी हभप हारदे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भागवत कथा सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे…….