नगर : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार स्व.विलास बानकर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य अश्विनी प्रकाश बानकर यांना जाहीर झाला आहे.
ग्रामीण भागात शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यात योगदानाबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ८ मार्च रोजी नगरमध्ये जेष्ठ अभेनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य अश्विनी बानकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.