वांबोरी : ससे-गांधले वस्ती येथील वाल्मिकी ॲग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड अंतर्गत भव्य पशुसंवर्धन शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे.
उपस्थित पशुपालकांना तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. दरम्यान पशु आरोग्य तपासणी व लसीकरण पशुपालन शेतकऱ्यांचे प्रशिक्षण मॉडेल पशु पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात येणार आहे. तरी परिसरातील पशुपालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ तोडमल व सचिव गणेश ससे व वाल्मिकी ऍग्रो कंपनीच्या संचालक मंडळाने यांनी केले आहे.
दरम्यान शेतकरी पशुपालकांसाठी सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर बहुमोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.