गणराज्य न्यूज राहुरी : देवळाली प्रवरा व परिसराचे आराध्य दैवत श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवानिमित्त आज शनिवार दि.१८मार्च रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प समाधान महाराज शर्मा(बीड) यांचे जाहीर हरिकीर्तन संपन्न होणार आहे.
21 मार्च पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष डॉ.विश्वास पाटील यांनी दिली
रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता ढोल ताश्यांच्या गजरात कावड मिरवणूक व गंगास्नान संपन्न होणार असून दुपारी ४ ते ९ वाजेपर्यंत भव्य पालखी मिरवणूक संपन्न होणार आहे. यावेळी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन मिरवणुकीस प्रारंभ होऊन बाजारतळ येथे सांगता होणार आहे. मिरवणुकीत महाराष्ट्रातील नाशिक, वैजापूर, बारामती, देवळाली प्रवरा यासह नामांकित बँड पथक हजेरी लावणार आहे. रात्री ९ वाजता शोभेच्या दारूची भव्य अतिषबाजी आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रातील नामांकित रोषणाईकार यांच्या कल्पनेतून फटाक्यांची आतिषबाजी साकारली जाणार आहे.
सोमवार दि.२० मार्च रोजी दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील नांमवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत. रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक २१ मार्च रोजी रात्री ९ वाजता पुणे व मुंबई येथील तुमच्यासाठी काहीपण आणि जीव रंगला या दोन सुपरहिट कलाकारांचा दुरंगी लावणी सामना रंगणार आहे. समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवात दिल्ली व अजमेर येथील रहाट पाळणे(जॉइंट व्हील) हे असणार आहे.
तरी परिसरातील भाविक व नागरिकांनी यात्रा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित रहावे असे श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा कमिटीने केले आहे.