Home राहुरी वने यांचे यश

वने यांचे यश

64
0

गणराज्य न्यूज ब्राम्हणी – गावातील गोविंद चांगदेव वने यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Mpsc) मधून मंत्रालय क्लर्क पदी निवड झाली आहे.

गोविंद वने यांच प्राथमिक शिक्षण ब्राम्हणीतील घेरुमाल वस्तीवरील झेडपी शाळेत तर,माध्यमिक शिक्षण आदर्श माध्यमिक विद्यालयात झाले.राहुरीतील स्व.रामदास धुमाळ महाविद्यालयात  BA economics डिग्री मिळविली.त्यानंतर 2018 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.अनेक दिवस अभ्यास केला.

विविध विभागाच्या भरपूर परीक्षा दिल्या.अखेर स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेत त्यांनी तिसऱ्यांदी यश मिळविले.

नुकतीच पीएसआय पदाची देखील त्यांनी परीक्षा दिली असून त्याची मुलाखत बाकी आहे.त्या निकालाकडे लक्ष लागून आहे.सर्व सामान्य कुटुंबातील गोविंद वने या तरुणाच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

आई – वडिलांनी कष्टातून शिकवून मुलाला अधिकारी बनवण्याच स्वप्न पाहिल. मुलाने त्यांच स्वप्न पुर्ण करुन दाखवलं.. आईवडिलांची इच्छा आहे. मुलाने इथेच न थांबता अजून मोठ यश मिळावं..
मुलाने या यशाचं संपूर्ण श्रेय आपल्या आईवडिलांना दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here