Home अहमदनगर शनिरत्न पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

शनिरत्न पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

80
0

 

सोनई : दरवर्षी शनिजयंती निमित्त देणारा यंदाचा शनिरत्न पुरस्कार हरियाणाचे श्री श्री 1008 परमहंस कृष्णानंद कालिदास महाराज यांना श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.आमदार शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शनिशिंगणापूरच्या वतीने देवस्थाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर (भाऊ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शनिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो.

यावेळी समाधान महाराज शर्मा, महंत सुनीलगिरीजी महाराज ,माजी आ.पांडुरंग अभंग,देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,उपाध्यक्ष विकास बानकर,आप्पासाहेब शेटे,दीपक दरंदले,पोपट शेटे,पोपट कु-हाट ,डॉ शिवाजीराव दरंदले, शहाराम दरंदले,छबुराव भुतकर, सौ. सुनीता आढाव , उद्योजक ,सोनी ,जयेश शहा, मुकेश तेजवणी,नेवासा तालुक्यातील ग्रामस्थ ,शनी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी कृष्णानंद कालिदास महाराज म्हणाले की, शनी भगवंताच्या दर्शनाने जीवनतील व्याधी दूर होतात.न्याय देवता सलेल्या शनी भगवंताच्या भूमीतून मिळालेला पुरस्कार उर्जादायी असल्याचे कालिदास महाराज म्हणाले. पानसनाला सुशोभीकरण प्रकल्प देशातील नदी सुशोभीकरण प्रकल्पाचे रोल मॉडेल असल्याचे त्यांनी यावेळी सांगत देवस्थानच्या कामाचे कौतुक केल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here