Home राहुरी राहुरीत राज्याभिषेक सोहळा उत्साहात

राहुरीत राज्याभिषेक सोहळा उत्साहात

16
0

राहुरी : येथे मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती व जिजाऊचा लेकी समुहाच्या वतीने राहुरी येथील छत्रपती चौक येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

या प्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष देवेंद्र लांबे,कोषागार प्रमुख संदीप गाडे,संघटक सतीश घुले,अशोक तनपुरे,बलराज पाटील,रोहित नालकर,महेंद्र शेळके,अविनाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी जिजाऊच्या लेकी समुहाच्या प्रमुख सौ.वर्षा लांबे म्हणाल्या कि गेल्या पाच वर्षान पासून राहुरी येथील छत्रपती चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत.कोरोना काळात संचारबंदी असल्यामुळे शिवशंभू प्रेमींना राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ला येथे जाता येत नव्हते.त्याकाळात मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी राज्याभिषेक सोहळा राहुरी येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला.शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा मान हा जिजाऊच्या लेकी समुहाला असतो.या कार्यक्रमाची वाट महिला मोठ्या आतुरतेने पहात असतात.समाजात राजमाता जिजाऊ यांच्या विचारांमुळे महिलांना आज मान सन्मान मिळत आहे.महापुरुषांच्या विचारांचा उत्सव साजरा करण्यासाठी महिलांनी उस्पुर्त सहभाग नोंदविणे गरजेचे आहे असे सौ.वर्षा लांबे यांनी म्हंटले आहे.

या प्रसंगी जिजाऊच्या लेकी ग्रुपच्या ज्योती नालकर,संगीता दरंदले,विद्या अरगडे,नीलिमा कारखिले,त्रिवेणी भोंगळ,मनीषा डोंगरे,सिंधू तनपुरे,चैताली सोमवते,श्रेया शहाणे,विद्या धनेकर,मराठा एकीकरणचे रवींद्र कदम,अण्णासाहेब तोडमल,शिवाजी थोरात,सुमित तनपुरे,देवेंद्र जाधव,विजय कोहकडे,कैलास तनपुरे,विनायक बाठे,मधुकर घाडगे,अशोक तुपे,सोमनाथ धुमाळ,अनिल पेरणे,दिनेश झावरे, शिवाजी तनपुरे,अनिल दरंदले,विलास थोरात,अभिजित काळे,किरण पाटील,अरुण निमसे,अशोक कदम,मेजर नामदेव वांढेकर,सागर ताकटे,जालिंदर कोहकडे संजय पोपळघट,शेखर सुडके,गणेश वांढेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here